भडगाव पोलिसांची मोठी कामगिरी : चोरट्याकडून पाच दुचाकी जप्त

0

Great achievement of Bhadgaon police: Five bikes seized from thieves भडगाव (18 सप्टेंबर 2024) : चोरीच्या पाच मोटारसायकलींसह एकास भडगाव पोलिसांनी अटक केली आहे. उमेश बबन पाटील (रा.गाळण, ता.पाचोरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भडगाव पोलीस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचे तीन, पारोळा पोलीस स्टेशनला दाखल एक आणि एक अनोळखी अशा पाच मोटारसायकली चोरट्याकडून जप्त करण्यात आल्या.

यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, हिरालाल नारायण पाटील, मनोहर जीवन पाटील, निलेश भालचंद्र ब्राम्हणकर, सुनील जयसिंग राजपुत, प्रवीण परदेशी, कुंदन संजय राजपुत यांनी ही कारवाई केली. तपास एएसआय हिरालाल पाटील करीत आहेत.


कॉपी करू नका.