चोरीच्या दोन दुचाकींसह मालेगावातील अट्टल चोरटे जाळ्यात धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांच्या जाळ्यात

गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता


धुळे (19 सप्टेंबर 2024) : मालेगाव शहरातील अट्टल दुचाकी चोरट्यांना चोरीच्या दोन दुचाकींसह चाळीसगाव रोड पोलिसांनी अटक केली आहे. चाळीसगाव रोड पोलिसात दोघे चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अन्सारी अब्दुल रहेमान अहमद (रा.चुनाभट्टी सिरात चौक, मालेगाव, जि.नाशिक) व मोहम्मद मुजम्मील शकील अहमद अन्सारी (रा.किदवाई रोड, शाळा नं.1, कुमारवाडा मालेगाव, जि.नाशिक) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव रोड परिसरातील मारोती नगरातील रहिवासी भूषण बाबासाहेब यलमार यांचे राहत्या घरासमोरून दुचाकी (एम.एच. 18 सी.बी.7711) ही 11 सप्टेंबरच्या मध्यरात्री चोरीला गेल्यानंतर चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच गोपनीय माहिती व तांत्रिक कौशल्याद्वारे मालेगाव येथून दोघांना अटक करण्यात आली. तक्रारदाराची एक लाख रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच. 18 सी.बी.7711) व अन्य एक होंडा कंपनीची विना क्रमांकाची एक लाख रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अप्र पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय अधिकारी ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे, हरीशचंद्र पाटील, हवालदार सुनील पाथरवट, अविनाश वाघ, रवींद्र ठाकुर, शोएब बेग, अतीक शेख, सिराज खाटीक, सचिन पाटील, विनोद पाठक, संदीप वाघ, जमीला पावरा आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.