वाचाळवीरांनी आपापल्या मर्यादा पाळाव्यात : अजितदादांनी मुख्यमंत्र्यांसमोरच सुनावले

0

Vachalveers should follow their limits : Ajitdada said in front of the Chief Minister बुलढाणा (19 सप्टेंबर 2024) : आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा ओळखले जातात. बुलढाण्यातील कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच आमदार संजय गायकवाड यांचे नाव न घेता वाचाळवीरांनी आपापल्या मर्यादा पाळाव्यात, असे सांगून खळबळ उडवून दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केल्याने त्याचे राजकीय पडसाद निर्माण झाले होते.

अजितदादांनी स्पष्टच सुनावले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अंजित पवार यांच्या उपस्थितीत माझी लाडकी बहीण कार्यक्रम बुलढाण्यात गुरुवारी झाला. आमदार संजय गायकवाड यांचीही उपस्थिती होती. आमदार संजय गायकवाड यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले, मी एक गोष्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेन. प्रत्येकाला आपापली मते आणि विचार मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. पण, कुठलाही सत्ताधारी किंवा विरोधी असेल, वाचाळवीरांनी आपापल्या मर्यादा पाळाव्यात.

महायुतीला अडचणीत आणू नका !
आपण शिव-शाहूंच्या महाराष्ट्रात राहतो. कुठेही वेडेवाकडे विधान करून कुठेही मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या घटक पक्षांना अडचणीत आणू नका. ठीक आहे, राग येतो. आम्हालाही येतो. पण, राग व्यक्त करताना काही मर्यादा असतात. त्यासंदर्भात कुठली भाषा वापरली जाते?, अशा शब्दात अजित पवारांनी फटकारले.

 

 


कॉपी करू नका.