ट्रक-बसचा भीषण अपघात : सहा जण जागीच ठार ; 18 जखमी


जालना (20 सप्टेंबर 2024) : आयशर ट्रक व बसमध्ये झालेल्या धडकेनंतर सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून 18 प्रवासी जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात जालना जिल्ह्यातील जालना-वडीगोद्री रोडवरील शहागड गावाजवळ झाला. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान
अंबाजोगाई आगाराची बस प्रवाशांना घेवून जालन्याकडे निघाल्यानंतर अंबडपासून 10 किमीवर ती आशयर व बसमध्ये अपघात झाला. यात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले. त्यातील सहा जणांची प्रकृती अधिक गंभीर आहे. अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला तर जालना-बीड मार्गावर वाहतूक कोंडी झाली. अपघातग्रस्त आयशर ट्रकमधून मोसंबी वाहतूक केली जात होती. जखमींना उपचारासाठी लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ओव्हरटेकच्या नादात अपघात
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार भरधाव वेगाने येणार्‍या आयशर ट्रक दुसर्‍या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसवर जाऊन आदळली. बसमध्ये 24 प्रवासी होते व किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !