दहा हजारांची लाच भोवली : खडकदेवळा सरपंचांसह दोघे जाळ्यात


Bribe of 10,000 : Khadakdevla sarpanch and two in the net पाचोरा (27 सप्टेंबर 2024) : गाव नमुना आठ अ मध्ये नाव लावण्यासाठी दहा हजारांची लाच मागून ती स्वीकारताना खडकदेवळा, ता.पाचोरा येथील सरपंच अनिल विश्राम पाटील (46) व खाजगी पंटर बलराम हेमराज भील (46,  खडकदेवळा बु.॥, ता.पाचोरा) यांना जळगाव एसीबीने अटक केल्यानंतर ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली आहे.

असे आहे लाच प्रकरण
40 वर्षीय तक्रारदार हे खडकदेवळा बुद्रुक गावातील रहिवासी आहेत. त्यांना  प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून तक्रारदार राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नसल्याने त्यांच्या नावावर गाव नमुना आठ अ मध्ये नावे लावण्यासाठी काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याचा मोबदल्यात सरपंच अनिल पाटील यांनी शुक्रवार, 27 रोजी  दहा हजार रुपयांची लाच मागणी केल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली व पडताळणी करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी खाजगी पंटराकडे लाच देण्याचे सरपंचांनी सांगितल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली व पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक
स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने तसेच पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, हवालदार रवींद्र घुगे, सुनील वानखेडे, शैला धनगर, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !