फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार


चाळीसगाव (30 सप्टेंबर 2024) : शहरातील विवाहितेला तिचे फोटो, व्हिडीओ आणि कॉल रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आरोपीने शिविगाळ करीत पोलिसात तक्रार दिल्यास परिवाराला संपवून टाकेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
चाळीसगाव शहरातील एका भागात 28 वर्षीय विवाहिता परिवारासह वास्तव्याला आहे. संशयित आरोपी तुषार उर्फ सागर बाबुराव बोरसे याने विवाहितेचा पाठलाग करून तिला शारिरीक सुखाची मागणी केली. तसेच विवाहितेचे फोटो, व्हिडीओ आणि कॉल रेकॉर्डींग तिच्या पतीला पाठविण्याची धमकी दिली. त्यानंतर संशयित आरोपी तुषार बोरसे याने विवाहितेला दुचाकीवर बसवून मित्राच्या रूमवर नेले व ज्युसमध्ये गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केला तसेच याबाबत कुणाला सांगितले किंवा पोलिसात तक्रार दिली तर परिवाराला जीवेठार मारेल, अशी धमकी दिली. 2 जुले ते आजपावेतो हा प्रकार घडला.

दरम्यान, हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी तुषार उर्फ सागर बाबुराव बोरसे यांच्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते हे करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !