अट्टल चोरटे जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात : भुसावळसह जळगावातून चोरलेल्या तीन दुचाकी जप्त


जळगाव (04 ऑक्टोबर 2024)  :एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना अटक करीत त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या. जळगाव तालुक्यातील उमाळा बसस्थानकासमोी ही कारवाई गुरुवार, 3 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता अटक केली आहे. पवन उर्फ भांजे गणेश पाटील (22) व निखील जयराम पाटील (21, दोन्ही रा. इंदिरानगर, कुसुंबा)

अवघ्यात 20 मिनिटात लांबवली दुचाकी
जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवाशी भूषण झांबरे 19 सप्टेंबर रोजी कामाच्या निमित्ताने दुचाकी (एम.एच.19 बी.एल.9334) वरून जळगावकडे येत असताना रस्त्यावरील उमाळा बसस्थानकाजवळ नास्ता करण्यासाठी थांबले मात्र अज्ञात चोरट्यांनी अवघ्या 20 मिनिटात हे त्यांची दुचाकी चोरून नेली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान कुसुंबा शिवारातील काही मुलांनी उमाळा गाव परिसरात अजून काही दुचाकी चोरी केलयाची पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना माहिती मिळाली. या गुन्ह्याच्या शोध घ्यावा, अशा सूचना पोलीस निरीक्षक निकम यांनी दिल्या.

गोपनीय माहितीवरून कारर्वा
एमआयडीसी पोलिसांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, नितीन ठाकूर, नाना तायडे, किरण पाटील, गणेश ठाकरे, ललित नारखेडे यांनी कारवाई करीत आरोपींना बेड्या ठोकल्या. तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !