चोपडा तालुक्यात अल्पवयीन मुलींना पळवून नेत अत्याचार


Underage girls were abducted and tortured in Chopra taluka जळगाव (05 ऑक्टोबर 2024) : दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेत त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. अडावद पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून सातत्याने अत्याचाराच्या घटना पाहता समाजमन संतप्त झाले आहे.

नदीकिनारी नेत केला अत्याचार
पीडित अल्पवयीन मुली आणि संशयित आरोपी एकाच गावातील आहे. या संशयितांनी अल्पवयीन मुलींना फूस लावून मोटरसायकलने पळवून नेत तापी नदीच्या किनारी निर्जनस्थळी नेत त्यांच्यावर अत्याचार केला. या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्या प्रकरणी दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात एक विधी संघर्षीत 17 वर्षीय बालकाचा समावेश असल्याने त्याची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली तर दुसर्‍या 19 वर्षीय तरुणाला सोमवारपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, दोन्ही पिडीत मुली या अल्पवयीन आहेत. त्यांना आरोपिंनी फूस लावून पळवून नेले होते. याबाबत अडावद पोलीस स्टेशनला त्यांची हरवल्याची नोंद करण्यात आली होती मात्र आता या प्रकरणात अत्याचाराचा गुन्हा दखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजु थोरात, हवालदार संजय धनगर, सतीश भोई करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !