कासोद्यात सिलिंडरचा स्फोट : आठ जण भाजले ; चौघे गंभीर


कासोदा, ता.एरंडोल (07 ऑक्टोबर 2024) : रेग्युलेटर लावताना गॅस गळती झाल्यानंतर झालेल्या स्फोटात आठ जण होरपळले असून त्यातील चौघे गंभीर जखमी झाले. ही घटना एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता खैरनारवाड्यात घडली. खमींवर कासोदा, जळगावात उपचार सुरू आहेत.

आगीत झाले हे जखमी
अनिल मराठे (45), भाऊसाहेब शामराव गायकवाड (45), सागर किसन मराठे (32), ज्ञानेश्वर देवराम पाटील (40), आबा सुकदेव चव्हाण (50), दीपक रमेश खैरनार (40), शुभम सुरेश पाटील (20) आणि नगराज देवराम पाटील (50) अशी भाजलेल्यांची नावे आहेत.

गॅस गळतीनंतर स्फोट
एंडोल तालुक्यातील कासोदा येथे अनिल पुना मराठे (मानकीवाले) हे शेतकरी वास्तव्यास आहेत. रविवार, 6 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास सिलिंडर संपल्यानंतर त्यांनी नवीन सिलिंडर आणत ते लावले मात्र गॅस गळती सुरू झाल्यानंतर तातडीने सिलिंडर बाहेर काढण्यात आले व त्याचवेळी गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला.

कुटूंब आले उघड्यावर
अनिल मराठे यांचे घर जुने व लाकडी बांधकामाचे असून स्फोटानंतर घराने पेट घेतला व एरंडोल अग्निशमन दलाने आग विझवली. आगीमुळे कुटूंब उघड्यावर आले असून प्रशासनाने तातडीने मदत देण्याची अपेक्षा आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !