चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : 45 लाखांचा गांजा जप्त
Major action of Chopra Rural Police : Ganja worth 45 lakhs seized चोपडा (08 ऑक्टोबर 2024) : चोपडा ग्रामीण पोलिसांनी मालापूर शिवारात गांजाची शेतीवर कारवाई करीत सुमारे 45 लाखांचा गांजा जप्त केला. संशयित पसार झाला असून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मालापूर शिवारातील एका शेतकर्याच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची गुप्त माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार रविवार, 6 रोजी चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी पथकासह कारवाई करीत 750 किलोग्रॅमचा ओला गांजा जप्त केला असून त्याची किंमत जवळपास 45 लाख रुपये आहे. संशयित रुमल्या चेचर्या पावरा (रा. डॅडीया पाडा ह. मु. चोपडा) हा मात्र पसार झाला. पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.

