मंदिरातून परतणार्या भाविक महिलेची पोत लांबवली : एकाला जळगाव तालुका पोलिसांकडून अटक
जळगाव (09 ऑक्टोबर 2024) : जळगाव तालुक्यातील नागझीरा फाट्याजवळ मंदीरातून दर्शन घेवून येणार्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरी हिसकावून चोरी करण्यात आली. एका संशयीताला अटक करण्यात आली. ही घटना सोमवार, 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता घडली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पायी येत असताना लांबवली पोत
जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात राहणार्या कलाबाई लक्ष्मण सोनवणे (53) या सोमवार, 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास गिरणा नदीकाठावरील नागाई जोगाई मंदीराचे दर्शन घेवून सुन दीपाली सोनवणे आणि जेठाणी सुनंदाबाई सोनवणे यांच्यासोबत पायी येत असताना. नागझिरा फाट्याजवळ संशयीत आरोपी अमर ताराचंद मोरे (32) आणि निलेश अरुण सोनवणे (दोन्ही रा.भातखंडे, ता.पाचोरा) यांनी कलाबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पळ काढला.

याप्रकरणी सायंकाळी पाच वाजता कलाबाई सोनवणे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमर ताराचंद मोरे आणि निलेश अरूण सोनवणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अमर मोरे याला अटक करण्यात आली. तपास पोलीस नाईक सुर्यकांत नाईक हे करीत आहे.
