जळगाव गुन्हे शाखेची मोठी कारवाई : एरंडोल शहरातील विद्युत तारेची चोरी करणारी टोळी जाळ्यात


Jalgaon Crime Branch’s big operation: A gang stealing electric wire in Erandol town is in the net जळगाव (09 ऑक्टोबर 2024) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एरंडोल आणि कासोदा शेत शिवारातील इलेक्ट्रिक पोलवरील तारेची चोरी करणार्‍या तिघांच्या टोळीला एरंडोल शहरातून मंगळवार, 8 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता अटक केली. चोरट्यांकडून चोरीला गेलेले इलेक्ट्रिक तारांचे बंडल जप्त करण्यात आले.

या संशयीतांना अटक
रवींद्र अनिल मिस्तरी (38), धनराज प्रकाश ठाकूर (46) व समाधान नारायण पाटील (45, सर्व राहणार एरंडोल) अशी अटकेतील संशयीताची नावे आहेत. त्यांनी एरंडोल पोलीस ठाण्यातील 3 आणि कासोदा पोलीस ठाण्यातील एक अशा चार गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींकडून दीड लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रिक विद्युत तार जप्त करण्यात आले.. पुढील कारवाईसाठी अटकेतील संशयित आरोपींना एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
एरंडोल आणि कासोदा शेत-शिवारातील परिसरातून महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक पोलवरील तार कारची चोरी केल्याप्रकरणी एरंडोल आणि कासोदा पोलीस ठाण्यात एकूण वेगवेगळे पाच गुन्हे दाखल होते. तारांचे चोरी करणारे संशयित आरोपी हे एरंडोल शहरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुन्हे उघडकिला आणण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले. त्यानुसार पथकाने मंगळवार, 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता एरंडोल शहरात जाऊन कारवाई केली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, विलास गायकवाड, राहुल बैसाणे, गोरख बागुल, भारत पाटील आदींनी ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !