जळगावात भीषण अपघातात विवाहितेचा मृत्यू ; पती जखमी


Married woman dies in horrific accident in Jalgaon : Husband injured जळगाव (09 ऑक्टोबर 2024) : जळगावात अपघातांची मालिका थांबायला तयार नाही. पतीसह दुचाकीवर निघालेल्या 52 वर्षीय विवाहितेला अजिंठा चौकात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विवाहितेचा मृत्यू झाला तर पती जखमी झाला. विशेष म्हणजे अज्ञात वाहनाच्या धडकेने महिलेचे शीर धडावेगळे झाला. हा अपघात बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडला. अज्ञात वाहन चालकाविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अनिता सुनील राणे (52, रा.सतगुरुनगर, जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

बांधकामस्थळी जाताना गाठले मृत्यूने
रिंगरोड परिसरात राणे दाम्पत्याच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावरील मजुरांना पाणी मिळावे यासाठी राणे दाम्पत्य पहाटेच रिगरोडकडे जात होते. परंतु, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. अनिता राणे यांच्या पश्चात पती, मुलगा तन्मय, मुलगी आदिती असा परिवार आहे.

अज्ञात वाहनाचा कसून शोध सुरू
अनिता राणे या बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास पती सुनील बाबुराव राणे यांच्यासोबत सतगुरु नगरातून दुचाकीने रिंगरोड भागात बांधकाम सुरु असलेल्या त्यांच्या घराकडे पाणी भरण्यासाठी जात असताना अजिंठा चौकात दुचाकी आल्यानंतर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत राणे दाम्पत्य दूर फेकले केले. त्यात अनिता राणे यांचे डोकं थेट धडापासून वेगळे झाले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर पती सुनील राणे यांनाही मार लागला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यालगत कुणी नसल्याने दाम्पत्याला उडविणार्‍या वाहनचालकाने घटनास्थळाहून पळ काढला.

एका रिक्षा चालकाला अपघात झाल्याचे कळल्यानंतर याबाबत त्याने एमआयडीसी पोलिसांना कळविले. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !