जळगावात आगीत तीन दुकाने जळाली : व्यावसायीकांचे लाखोंचे नुकसान


Three shops burnt down in fire in Jalgaon: loss of lakhs to traders जळगाव (09 ऑक्टोबर 2024) : शहरातील नेरी नाक्याजवळील एसटी वर्कशॉप समोरील दुकानांना अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवार, 9 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. आगमीमुळे दुकानाबाहेर लावलेल्या चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. आगीचे कारण कळू शकले नाही. शनिपेठ पोलिसात आगीची नोंद करण्यात आली.

आगीचे कारण अस्पष्ट
शेख साबीर इस्लाम (45, रा.सालार नगर) यांचे कुशन व रेक्झीनचे गोडावून असून त्यास अचानक आग लागली. यासोबतच त्यांच्या बाजूला असलेल्या सुधीरचंद मन्ना यांच्या ऑटो गॅरेज दुकान आणि अशोक गुलाब महाजन यांच्या चहाच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन विभागाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले.

या आगीत दुकानांच्या बाहेर लावलेल्या कार (एम.एच.04 ई.एच.7014) जळाल्याने तिचे नुकसान झाले. सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, फायरमन अश्वजीत घरडे, गिरीश खडके, वाहनचालक देविदास सुरवाडे, इकबाल तडवी, महेश पाटील, भगवान पाटील, रोहिदास चौधरी, तेजस जोशी, फायरमन भाग्यश्री बाविस्कर, विजय पाटील, मनोज पाटील, सरदार पाटील, जगदीश साळुंखे, पन्नालाल सोनवणे, योगेश कोल्हे, नंदकिशोर खडके, निवांत इंगळे, संजय भोईटे, संतोष तायडे, भारत छापरिया आदींनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !