शिरसोलीनजीक भीषण अपघात : दोघे तरुण जागीच ठार
Fatal accident near Shirsoli : Two youths killed on the spot जळगाव (10 ऑक्टोबर 2024) : जळगावजवळील शिरसोलीजवळ भरधाव कारने दुचाकीला उडवल्याने विटनेर तांडा गावातील तरुण ठार झाले. हा अपघात गुरुवार, 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. कांतीलाल उर्फ कान्हा रमेश राठोड (24) व रवींद्र किसन चव्हाण (30, दोन्ही रा.विटनेर तांडा, ता.जळगाव) अशी मयतांची नाव आहेत.
भरधाव कारच्या धडकेने मृत्यू
जळगाव तालुक्यातील विटनेर तांडा या गावात कांतीलाल राठोड आणि रवींद्र चव्हाण हे वास्तव्याला होते. दरम्यान गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास दोघेजण दुचाकी क्रमांक नंबर (एमएच 19 इएल 311) ने शिरसोलीकडून जळगावकडे येत असताना शिरसोली गावातील आकाशवाणी केंद्राच्या टॉवर समोरून भरधाव कारने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला तर बाईकचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमींना खाजगी वाहनातून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तरुणांना मृत घोषित केले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
कांतीलालच्या पश्चात आई आणि मोठा भाऊ तर रवींद्र चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, काका, आजोबा आणि काकू असा परिवार आहे
