रावेर तालुक्यातील शेतकर्याला सव्वा दहा लाखांचा ऑनलाईन गंडा
A farmer in Raver taluka received an online payment of one and a half million जळगाव (15 ऑक्टोबर 2024) : बँकेच्या नावाने अॅप लिंक पाठवून त्या माध्यमातून रावेर तालुक्यातील शेतकर्याला 10 लाख 24 हजारांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी सोमवार, 14 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
रावेर तालुक्यातील केर्हाळा गावात 45 वर्षीय शेतकरी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. 10 ऑक्टोबर रोजी त्यांना त्यांच्या व्हॉटसप मोबाईलवर एका अनोखळी नंबरवरून एका बँकेच्या नावाने एपीके फाईल पाठविण्यात आली. त्यांनी अॅपच्या लिंकला क्लिक केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलचा ताबा घेवून त्यांच्या बँक खात्यातून परस्पर 10 लाख 24 हजार रूपये अन्य खात्यात ऑनलाईन वळवून फसवणूक केली.

अज्ञाताविरोधात गुन्हा
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकर्याने सोमवार, 14 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.
