जळगावातील शनीपेठ पोलिसांची मोठी कारवाई : खानावळीतून 32 हजारांचा दारू साठा जप्त
जळगाव (18 ऑक्टोबर 2024) : जळगावातील शनीपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे जोशी पेठ परिसरातील विकी टेलर चौकातील खानावळीतून 31 हजार 800 रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला व संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवार, 17 ऑक्टोबर रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. सनत अनिल घोरूल (जोशी पेठ, सीताराम प्लाझाजवळ, जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगावच्या जोशी पेठ परिसरात विकी टेलर चौकातील खानावळीत विना परवाना देशी विदेशी दारूचा साठा करून ओळखीच्या गिर्हाईकांना विक्री होत असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पोललसांनी गुरूवारी दुपारच्या सुमारास कारवाई करत संशयित आरोपी सनत अनिल घोरूल (55. रा.जोशीपेठ, सिताराम प्लाझा, जळगाव) याला ताब्यात घेत त्याच्याकडून 31 हजार 800 रूपये किंमतीच्या देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक फौजदार परीष जाधव, योगेश माळी, विकी अशोक इंगळे, गणेश ढाकणे, अमोल वंजारी यांनी कारवाई केली आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश माळी हे करीत आहे.
