चोपडा येथे पावणेदोन लाखांचा गुटखा जप्त ; आरोपीस अटक


चोपडा (25 ऑक्टोबर 2024) : चोपडा पोलिसांनी गोदामात छापा टाकून तब्बल एक लाख 87 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. यावेळी आरोपीला अटक करण्यात आली. केजीएन कॉलनी नायरा पेट्रोल पंपच्या मागील गल्लीमधील घराच्या बाजूस असलेल्या गोदामात ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
गुरुवार, 24 रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मोहम्मद कादीश शेख आयुब (38, राहणार केजीएन कॉलनी नायरा पेट्रोल पंप) च्या मागील गल्लीमध्ये राहत असलेल्या घराच्या बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये पोलिसांनी धाड टाकून प्रतिबंधीत पानमसाला व सुंगधीत तंबाखू / जर्दा असा एक लाख 87 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार) तसेच चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, एपीआय एकनाथ भिसे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वालटे, विजय देवरे, योगेश्वर हिरे, जितेंद्र सोनवणे, संतोष पारधी, शिंपी, ज्ञानेश्वर जवागे, संदीप भोई, प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, विनोद पाटील, अमोल पवार, मदन पावरा, रजनिकांत भास्कर, अक्षय सुर्यवंशी, समा तडवी यांनी ही कारवाई केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !