भाऊबिजेलाच विवाहितेची पतीसह आत्महत्या : रावेर तालुक्यातील घटना


रावेर (3 नोव्हेंबर 2024) : भाऊबिजेच्या सणाचा एकीकडे उत्साह सुरू असतानाच दुसरीकडे रावेर तालुक्यातील विवरे खुर्दला विवाहितेने आपल्या पतीसह आत्महत्या केली.

रावेर तालुक्यात खळबळ
विवरे खुर्द येथील कुंभारवाडा भागात रविवारी अनिल देविदास हरणकर (40) तर पत्नी शीतल अनिल हरणकर (35) यांनी आत्महत्या केली. दोघांना एक मुलगी व दोन मुले आहे. वीट भट्टीवर काम करुन उदानिर्वाह करून आपले कुटुंब चालवणार्‍या दाम्पत्याने टोकाचे पाऊल का उचलले ? याची माहिती कळू शकली नाी.

कुंभार वाड्यातील घराच्या वरच्या खोलीत दाम्पत्याने लांब रुमालच्या सहायाने गळफास घेतला. लहान मुलगा पाणी पिण्यासाठी वरच्या खोलीत गेल्यानंतर घटनेचा उलगडा झाला. नागरिकांनी रावेर ग्रामीण रुग्णालयात मृतदेह नेल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !