हडपसर-बिलासपूर दरम्यान विशेष रेल्वे गाडीच्या दोन फेर्‍या


भुसावळ (7 नोव्हेंबर 2024) : रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होत असलेली गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाकडून हडपसर ते बिलासपूर दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालविण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांच्या जागेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. रेल्वे गाड्यांना होत असलेली प्रवाशांची गर्दीमुळे रेल्वे प्रशासनाने हडपतर ते बिलासपूर या मार्गावर विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या दोन फेर्‍या होतील.

गाडी क्रमांक 08296 हडपसर-बिलासपूर विशेष गाडी पुण्याहून 9 नोव्हेबर रोजी दुपारी 3.10 वाजता सुटेल आणि बिलासपूरला दुसर्‍या दिवशी दुपारी 3.30 वाजता पोहोचणार आहे तसेच गाडी क्रमांक 08295 बिलासपूर-हडपसर-स्पेशल गाडी ही बिलासपूर येथून 8 रोजी दुपारी दोन वाजता सुटेल आणि हडपसरला दुसर्‍या दिवशी दुपारी 12 वाजता पोहोचेल. ही गाडी दौंडमार्गे नगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग आणि रायपूर येथे थांबणार आहे. प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशसानाने केले आहे.


कॉपी करू नका.