कापूस व्यापार्‍याच्या खुनाचा उलगडा : गुन्हे शाखेतील कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांचा अपर महासंचालकांकडून गौरव


जळगाव : फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी यांची पाळधीजवळ रोकड लुटण्याच्या उद्देशाने 26 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता निर्घृण हत्या करण्यात आली होती. कोणताही पुरावा नसताना जळगाव गुन्हे शाखेने कौशल्य पणाला लावून या गुन्ह्यात पोलिस असलेल्या आरोपीसह सहा जणांच्या मुसक्या आवळत पाच लाख 97 हजारांची रोकडही जप्त केली होती. गुन्हे शाखेच्या या कार्याची दखल घेत जिल्हा दौर्‍यावर आलेले अपर पोलिस महासंचालक विनय कारगावकर (नागरीक हक्क संरक्षण, मुंबई) यांनी शुक्रवारी जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह गुन्ह्याची उकल करणार्‍या उकल करणार्‍या पथकातील कर्मचार्‍यांचा विशेष गौरव केला.






या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा गौरव
व्यापार्‍याच्या खुनानंतर गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पेलत गोपनीय माहिती तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हे शाखेने गुन्ह्याची उकल केली होती. या कार्याची दखल शनिवारी जिल्हा दौर्‍यावर आलेल्या अपर पोलिस महासंचालकांनी घेतली. पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा प्रशस्तीपत्र देवून त्यांनी सन्मान करीत आणखी जोमाने कार्य करण्याचीही अपेक्षाही व्यक्त केली. जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह हवालदार लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक श्रीकृष्ण देशमुख, पोलिस नाईक किशोर राठोड, पोलिस नाईक रणजीत जाधव, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील यांचा प्रसंगी सन्मान करण्यात आला. प्रसंगी नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !