सातोद-कोळवद रस्त्यावर दुचाकी घसरून 19 वर्षीय तरुण गंभीर जखमी
यावल (14 नोव्हेंबर 2024) : यावल शहरातून सातोद-कोळवदकडे जाणार्या रस्त्यावर दुचाकी घसरली. या अपघातामध्ये 19 वर्षीय तरुण हा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे त्याच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले असून त्याच्या चेहर्याजवळ जबर दुखापत झाली. तरुणाची प्रकृती सध्या गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहे. हा अपघात मंगळवारी रात्री घडला.
तरुणाची प्रकृती गंभीर
यावल शहरातून सातोद- कोळवदकडे जाणारा रस्ता असून या रस्त्यावरून दुचाकीद्वारे साजीद अरमान तडवी (19, परसाडे) हा तरुण जात असताना अचानक रस्त्यावर पडलेल्या दगडावरून त्याची दुचाकी स्लीप झाली आणि घसरली. तरुणाच्या चेहर्यावर व डोक्यावर जबर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू केले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.