रावेर पोलिसांकडून पाडळी शिवारात गावठी हातभट्टीवर धाड : 32 हजारांचा मुद्देमाल नष्ट
रावेर (15 नोव्हेंबर 2024) : रावेर पोलिसांनी धडक कारवाई करीत पाडला शिवारातील गावठी दारु हातभट्टी उद्ध्वस्त करीत 32 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. रावेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गावठी दारुची हातभट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळताच त्यांनी कारवाईचे निर्देश दिले.
यांनी केली कारवाई
हवालदार नितीन डांबरे, प्रमोद पाटील, सचिन घुगे, विशाल पाटील यांच्या पथकाने पाडला शिवारातील बांधावर असलेल्या अवैध गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकली. या ठिकाणी गुळमोह मिश्रीत कच्चे रसायन वेगवेगळ्या पत्री डब्यामंध्ये व गावठी तयार दारुचा एक प्लॉस्टिकचा कॅन असा एकूण 32 हजार 50 रुपये किंमतीचा मिळालेला मुद्देमाल पथकाने नष्ट केला. कॉन्स्टेबल सचिन घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शत्रुधन पाटील (रा.निरुळ) यांच्याविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.