कोथळीत अॅड.रोहिणी खडसेंसह परिवाराने बजावला मतदानाचा हक्क
कोथळी (बुधवार, 20 नोव्हेंबर 2024) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवार अॅड.रोहिणी एकनाथराव खडसे यांनी कोथळी येथील मतदान केंद्रावर बुधवारी सकाळी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, मंदा खडसे, शारदा खडसे चौधरी, डॉ.प्रांजल खेवलकर यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी उमेदवार रोहिणी खडसे यांनी मतदारांना मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले.

लोकशाहीच्या या उत्सवात आपण सुद्धा सहभागी व्हा लोकशाहीने दिलेल्या मुलभूत अधिकाराचा वापर करून मतदान करा, असे मतदानानंतर अॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या. यावेळी सरपंच नारायण चौधरी, योगेश चौधरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.




