रावेर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल जावळेंनी सहपरिवार बजावला हक्क
रावेर (20 नोव्हेंबर 2024) : रावेर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांनी कुटूंबासह आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांनी बुधवारी सकाळी सौभाग्यवती जयश्री, आई कल्पना जावळे व भगिनी पल्लवी पाटील यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.

सशक्त लोकशाहीसाठी मतदान गरजेचे
राज्यात सशक्त लोकशाहीसाठी मतदान आवश्यक असून प्रत्येक नागरिकाने मतदानासाठी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन अमोल जावळे यांनी यावेळी केले.




