भुसावळ विधानसभेत आमदारांचा विजयाचा चौकार : 18 व्या फेरीअखेर 32 हजार 862 मतांचा लीड
भुसावळ (23 नोव्हेंबर 2024) : भुसावळातील महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांना पहिल्या फेरीपासून घेतलेली मतांची आघाडी 18 व्या फेरीअखेरही कायम होती. 18 फेरीत आमदार संजय सावकारे यांनी 32 हजार 862 मतांचा लीड घेत विजयाची घौडदोड सुरू केली आहे.
तहसील कार्यालयाच्या गोदामात शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. टपाली मतांची आधी मोजणी करण्यात आल्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी करण्यात आली

अशी आहेत 18 व्या फेरीतील मते
आमदार संजय सावकारे (भाजपा) 81452
डॉ.राजेश मानवतकर (काँग्रेस) 48590
स्वाती जंगले (अपक्ष) 5895
जगन सोनवणे (वंचित) 3095
(आम्ही मतमोजणी अपडेट दिवसभर याच लिंकवर देवू, कृपया लिंक रिफे्रश कराल)




