रावेरात भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांचा दणदणीत विजय
रावेर (23 नोव्हेंबर 2024) : रावेर विधानसभेसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अमोल जावळे हे 43 हजार 562 मतांनी विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांचा दणदणीत पराभव केला आहे.
अमोल जावळेंनी तोडला लीड
पहिल्या फेरीत पहाडपट्टीमधील गारखेडा ,पाल, मोरव्हाल, गुलाबवाडी, मोहमांडली, जीन्सी या गावांची चौथी फेरी लोहारा, खिरोदा प्र.रावेर, केर्हाळा, मंगळूर, जानोरी, अहिरवाडी, पाडले, मोहगन येथील मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर धनंजय चौधरी यांनी सुरूवातीच्या तीन फेर्यांपर्यंत चार 842 मतांचा लीड घेतला मात्र नंतर भाजपाचे अमोल जावळे यांनी आघाडी घेत निर्विवाद विजय मिळवला.

अशी आहेत उमेदवारांना मिळालेली मते
अमोल जावळे (भाजपा, विजयी) 113676
धनंजय चौधरी (काँग्रेस) 70114
अनिल चौधरी (प्रहार) 25114
दारा मोहम्मद (अपक्ष) 9814
(आम्ही मतमोजणी अपडेट दिवसभर याच लिंकवर देवू, कृपया लिंक रिफे्रश कराल)




