महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू : उद्धव ठाकरे
We will continue to fight for the interests of Maharashtra : Uddhav Thackeray मुंबई (23 नोव्हेंबर 2024) : राज्यात विधानसभेचा निकाल हा अनपेक्षीत असून ही लाट नाही तर त्सुनामीच आहे. ज्यांनी ज्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला, त्या सर्वांचे मी आभार मानतो मात्र राज्यातील एकूण आकडेवारी पाहिल्यानंतर या सरकारला एखादा बिल अधिवेशनात मंजुरीसाठी मांडण्याची आवश्यकताच नाही, विरोधी पक्षच ठेवायचा नाही, असे चित्र भाजपने महाराष्ट्रात ठेवले असल्याचे माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
वन नेशन बरोबर आता वन पार्टी करायचे आहे का ?
काही महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एकच पार्टी ठेवायचे, असे म्हटले होते. त्यानुसार राज्यात ‘वन नेशन वन इलेक्शन’ बरोबरच ‘वन पार्टी’ देखील करायचे आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. जनतेने महायुतीला मतदान का केले? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्यात सोयाबीनला भाव मिळत नाही, म्हणून महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला मते दिली का? की इतर कोणत्या रागापोटी मते दिली, हे कळत नाही. या मागचे गुपित काही दिवसांनी शोधावे लागेल, असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू
काही लोक म्हणतात की, इव्हीएमचा विजय आहे, असूही शकतो. मात्र महाराष्ट्रातील जनतेला हा विजय मान्य असेल तर कोणीच काही बोलण्याची आवश्यकता नाही. मात्र मान्य नसेल तर त्यांना महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू, असा हे आम्हाला सांगायचे असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यावेळी तरी अस्सल भाजपचा कोणीतरी मुख्यमंत्री होईल, अशी अपेक्षा किंवा आशा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.




