भुसावळातील कृष्णा नगरातील तरुणाने घेतला गळफास
भुसावळ (शुक्रवार, 17 जुलै 2026) : शहरातील कृष्णा नगर परिसरातील रहिवासी असलेल्या मुकेश शांताराम पाटील (35) या तरुणाने कुठल्यातरी कारणातून गळफास घेतला. ही घटना गुरुवार, 16 जुलै 2026 रोजी दुपारी समोर आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
राहत्या घरात गळफास
शहरातील कृष्णा नगर, साई डेअरी मागे पाटील कुटूंब एकत्र वास्तव्यास असून मजुरी हा त्यांचा व्यवसाय आहे. या कुटूंबातील कुटुंबातील सदस्य कामानिमित्त बाहेर असताना घरातून फोनद्वारे घडलेल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर सदस्यांनी धाव घेतली असता मुकेश पाटील यांनी स्वयंपाकघरातील पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.


बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवल्यानंतर त्यांनी पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी हलवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख करीत आहेत.