भुसावळात ट्रकच्या धडकेत 58 वर्षीय सायकलस्वार ठार
58-year-old cyclist killed in truck collision in Bhusawal भुसावळ (4 डिसेंबर 2024) : भरधाव ट्रकने धडक दिल्याने शहरातील 58 वर्षीय सायकलस्वार ठार झाला. हा अपघात यावल रोडवरील बल्लू गॅरेजसमोर 1 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडला. अपघातप्रकरणी ट्रक चालकाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
ट्रक चालकाविरोधात गुन्हा
सुनील रमेश कडेरे (47, वाल्मीक नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, 1 रोजी रात्री साडेदहा वाजता चंदन बाबूलाल बारसे (58, मारोती नगर, काका ढाब्यामागे, भुसावळ) हे यावल रस्त्यावरून सायकलीवरून जात असताना भरधाव ट्रक (आर.जे.11 जी.बी.6651) वरील अज्ञात चालकाने धडक दिल्याने बारसे यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक पसार झाला. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक जप्त केला असून तपास सहाय्यक निरीक्षक राहुल भंडारे करीत आहेत.


