सावद्यात कत्तलीपूर्वीच सहा गायींची सुटका ; चौघांवर गुन्हा दाखल
Six cows rescued before slaughter in Savada ; Case registered against four सावदा (4 डिसेंबर 2024) : शहरातील ख्वाजानगर भागातील एका गोदामात डांबून ठेवलेल्या एक लाख 35 हजार रुपये किंमतीच्या सहा गायींची पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई मंगळवार, 3 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेर तालुक्यातील सावदा येथील खाजा नगर भागातील शेख रसूल शेख चाँद कुरेशी यांच्या पत्री गोदामात विविध प्रजातीच्या सहा गायी कोंबून ठेवल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर त्यांची सोडवणू करीत गो शाळेत रवानगी करण्यात आली. 15 हजार रुपये किंमतीची गावरान गाय, 15 हजार रुपये किंमतीची सैवाल क्रॉस जातीची गाय, 35 हजार रुपये किंमतीची गीर जातीची गाय, 30 हजार रुपये किंमतीची कंकरेज जातीची गाय, 25 हजार रुपये किंमतीची गीर क्रॉस जातीची गाय, 15 हजार रुपये किंमतीची नेमाडी जातीची गाय अशा एकूण एक लाख 35 हजार रुपये किंमतीच्या सहा गायींची कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या असताना सुटका करण्यात आली. याप्रकरणी गोदाम मालक शेख रसूल शेख चाँद कुरेशी (40), शेख जग्गा शेख कुरेशी, शहाबाज जमील कुरेशी, साहिल जमील कुरेशी (सर्व राहणार ख्वाजा नगर, सावदा) यांच्याविरोधात कॉन्स्टेबल मयूर पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश पाटील करीत आहेत.

