पुतण्यासोबत निघालेल्या महिलेचा ट्रॅक्टरची धडकेने करुण अंत : ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा


Woman killed in tractor accident while out with nephew: Case filed against tractor driver जळगाव (14 डिसेंबर 2024) : पुतण्या आणि काकू जात असलेल्या दुचाकीला भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीवरून कोसळून महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नेरी ते वावडता रस्त्यावरील विटनेरजवळील शिव ढाब्यासमोर 2 डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी तब्बल 10 दिवसांनंतर गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालक ज्ञानेश्वर बळीराम दाढे ( 40, रा.पळासखेडा मिराचे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे अपघात प्रकरण
गणेश भास्कर पाटील व त्यांच्या काकू गीता भगवान पाटील (42, रा. माळपिंप्री, ता.जामनेर) हे दुचाकीने वावडदा येथे जात होते. नेरी ते वावडदा रस्त्यावर विटनेर गावाजवळ शिवढाब्याजवळ हॉर्न देऊन गणेश पाटील हे ट्रॅक्टरला ओव्हेरटेक करीत होते. त्याचवेळी ट्रॅक्टरचालकाने रस्त्यामध्ये मध्यभागी वेगात आणत दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरून कोसळल्यानंतर ट्रॅक्टरच्या चाकाखाली डोके सापडून महिलेचा जागीच मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ तपास करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !