भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना मंत्रीपद : आज नागपूरात शपथविधी


Bhusawal MLA Sanjay Savkare gets ministerial post नागपूर (15 डिसेंबर 2024) : महायुती सरकारचा मंत्री मंडळ विस्तार आज रविवारी दुपारी नागपूरात होत आहे. भाजपामधून कुणाला मंत्री पद मिळणार ? याबाबत उत्सुकता लागून असतानाच भुसावळकरांसाठी मात्र आनंददायक बातमी समोर आली आहे. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनाही मंत्री पद देण्यात आले असून त्यांचा शपथविधी आज होणार असल्याची माहिती आमदारांचे निकटवर्तीयांनी माध्यमांशी दिली. यापूर्वी राष्ट्रवादीकडून मंत्री झालेल्या सावकारे यांना आता भाजपाकडूनही मंत्री पद मिळत असल्याने कार्यकर्ते प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.

भाजपकडून यांना आले मंत्री पदासाठी फोन
नितेश राणे
शिवेंद्रराजे भोसले
चंद्रकांत पाटील
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर


शिंदे गटाकडून यांना संधी
शिंदे गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उदय सामंत, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील, आणि दादा भुसे यांना मंत्री पद मिळणार आहे. याशिवाय, संजय शिरसाठ, भरत गोगावले, आणि योगेश कदम यांसारख्या नव्या चेहर्‍यांनाही संधी मिळणार आहे. मात्र, दीपक केसरकर, तानाजी सावंत, आणि अब्दुल सत्तार यांना यावेळी डावलण्यात येण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटातील यांना संधी
अजित पवार गटातून छगन भुजबळ, आदिती तटकरे, आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार आहे. याशिवाय, मकरंद पाटील आणि संजय बनसोडे यांचीही निवड झाल्याचे समजते. इंद्रनील नाईक यांना राज्य मंत्री पद देण्यात येणार आहे.

आज दुपारी शपथविधी

रविवारी दुपारी तीन वाजता शपथविधी समारंभ नागपूरच्या राजभवनात होणार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !