मद्य, जुगाराच्या आहारी गेलेल्या प्रियकराची हत्या : प्रेयसीसह चौघांना अटक
नाशिक (मंगळवार, 18 ऑगस्ट 2026) : मद्याच्या व जुगाराच्या आहारी गेलेला प्रियकर वारंवार प्रेयसीला मारहाण करीत तिचे पैसेही चोरत असल्याने प्रेयसीने त्याचा थेट काटाच काढला. नाशिकमधील या खुनाची उकल करण्यात यंत्रणेला यश आले असून कार चालकासह प्रेयसी व अन्य दोघांना अटक करण्यात आली. वसंत गोरखनाथ सातपुते (40, रा. स्वराज्यनगर, पाथर्डी फाटा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुठलीही मिसिंग दाखल नसताना हा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
काय आहे प्रकरण
वसंत सातपुते अचानक बेपत्ता झाल्यानंतरही याबाबत पोलिसांत मिसिंग तक्रार नव्हती. खबर्याने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी शहानिशा केली. संशयीत हसीना शेख व तिचा मित्र साहिल शहा आणि साथीदारांनी कारमधून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची पक्की टीप मिळाली. त्यानंतर पथकाने कार चालक सरफराज अबरार सय्यद (रा. नानावली) याला ताब्यात घेत बोलते केल्यानंतर चौकशीत त्याने कारमधून मृतदेह नेल्याची कबुली दिली. पथकाने कसारा घाटात मृतदेह शोधला. संशयित साहिल रफिक शहा, मोईन मुख्तार शहा या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
प्रेयसीचे पैसे चोरून करायचा मौज
मृत सातपुतेला मद्य-जुगाराचा नाद होता. हसीनाचे पैसे चोरी करून तो मौज करायचा. मारहाण-शिविगाळही करत असल्याने हसीना त्रस्त होती. तिने मित्र साहिलला सांगितले, कट रचला. मद्याच्या नशेत असताना वसंतचा गळा चिरून 18 तास मृतदेह घरातच ठेवला. शांत डोक्याने कट रचून मध्यरात्री काामधून कसारा घाटात नेऊन मृतदेह फेकला. यानंतर संशयीत मुंबई फिरले व रक्ताचे डाग धुवून चाकू फेकून देत पुरावे नष्ट करण्यात आले. दरम्यान, या संदर्भात डिएमने ऑनलाईन वृत्त दिले आहे.
