…मी संजय सुशीला वामन सावकारे : नागपूरात घुमला आवाज ; कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष


नागपूर (15 डिसेंबर 2024) : महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रविवारी नागपूरात झाला. महायुतीकडून एकूण 39 आमदारांना शपथ देण्यात येत असून 25 क्रमांकावर भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शपथ घेतली. यावेळी आमदार संजय सावकारे हे शपथ घेण्यासाठी येताच भुसावळातील कार्यकर्त्यांनी तुफान जल्लोष करीत आमदारांचा जयजयकार केला.

दुसर्‍यांदा मंत्री पदाची संधी
भाजपामधून कुणाला मंत्री पद मिळणार ? याबाबत उत्सुकता लागून असतानाच आमदार संजय सावकारे यांना दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा फोन आल्यानंतर ते नागपूरात रवाना झाले तर त्यांच्या परिवारातून सौभाग्यवतीन रजनी व मुलगी सुनिधी देखील नागपूरात पोहोचल्या. आमदारांच्या शपथविधीसाठी भुसावळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागपूरात दाखल झाले आहेत. आमदारांनी शपथविधी घेताच कार्यकर्त्यांनी नागपूरातही जल्लोष केला.

सावकारे यांना 2013-2014 मध्ये घरकुल घोटाळ्यात गुलाबराव देवकर अडचणीत आल्यानंतर राष्ट्रवादीकडून राज्यमंत्री पद मिळाले होते. आता भाजपाकडूनही मंत्रीपद मिळाने यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांत प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.


कॉपी करू नका.