एचडीएफसी बँकेच्या सीडीएम मशीनमध्ये टाकल्या शंभराच्या बनावट नोटा : जळगावातील ग्राहकाविरोधात गुन्हा


Fake Rs 100 notes inserted into HDFC Bank’s CDM machine जळगाव (15 डिसेंबर 2024) : जळगावच्या गणेश कॉलनीतील एचडीएफसी बँकेच्या कॅश डिपॉझिट (सीडीएम) मशिनमध्ये शंभर रुपयांच्या 14 बनावट नोटा सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. हा प्रकार 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर शुक्रवार, 13 रोजी जिल्हापेठ पोलिसात ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
शहरातील गजानन कॉलनीत संदीप सुदाम चौधरी हे वास्तवयास असून ते गणेश कॉलनीतील एचडीएफसी बँकेत मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या बँकेशेजारी असलेल्या एटीएम व सीडीएम मशीन असलेल्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये संशयीत निशीांत कैलास पाटील याने शंभर रुपये दराच्या 14 बनावट नोटा जमा केल्या होत्या. ही घटना उघडकीस आल्यानंतर शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी मॅनेजर संदीप चौधरी यांनी जिल्हापेठ पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार संशयीत निशिकांत कैलास पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक उल्हास चहाटे हे करीत आहे.

 


कॉपी करू नका.