स्वच्छ प्रतिमा, नेतृत्व गुणांमुळे आमदार सावकारेंची दुसर्यांदा मंत्री पदी वर्णी
शपथविधीनंतर भुसावळसह नागपूरातही कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
MLA Savkare was appointed as a minister for the second time due to his clean image and leadership qualities. भुसावळ (15 डिसेंबर 2024) : भुसावळच्या राजकीय पटलावर सलग चार टर्म निर्विवाद आमदार म्हणून निवडून आलेल्या आमदार संजय सावकारे यांना फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात पुनश्च संधी देण्यात आली. आमदार संजय सावकारे यांची मंत्री मंडळात वर्णी लागणार असल्याचे वृत्त भुसावळात रविवारी सकाळी धडकल्यानंतर कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांनी जल्लोष केला तर शपथविधी नंतर आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालयाबाहेर तसेच नाहाटा चौफुलीवर पदाधिकार्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत लाडू वाटप करून जल्लोष केला.
दुसर्यांदा भुसावळला मंत्री पदाची संधी
महाराष्ट्र निर्मितीनंतर भुसावळ मतदारसंघाला प्रथमच 2013-14 मध्ये आमदार संजय सावकारे यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्य मंत्री पद बहाल केले होते. आमदार सावकारे यांच्या मंत्री रुपाने त्यावेळी नव्या इतिहासाची निर्मिती झाली होती. अनेक दिग्गजांनी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करूनही त्यांच्या पदरी निराशा आली होती मात्र आमदार सावकारे मात्र त्यास अपवाद ठरले होते.
स्वच्छ प्रतिमेसह नेतृत्व गुणांमुळे पुन्हा मंत्री पद
फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात 19 नव्या चेहर्यांना संधी देण्यात आली असून भाजपाने नऊ नव्या चेहर्यांना संधी दिली आहे. त्यात भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचाही समावेश आहे. यापूर्वी राज्य मंत्री राहून चुकलेले आमदार सावकारे हे सलग चौथ्यांदा भुसावळातून निवडून आले आहेत. गेल्या तीन टर्मच्या काळात आमदार सावकारे यांच्यावर कुठलाही बदनामीचा डाग नाही व स्वच्छ प्रतिमा असलेले आमदार म्हणून त्यांची असलेली ओळख, उच्च शिक्षणासोबत विकासाची विधायक दृष्टी व नेतृत्व गुणांमुळे तसेच सामाजिक समीकरणांचे गणित पाहता त्यांना मंत्री पदाची संधी मिळाली आहे.
भुसावळातील विकासाचा अनुशेष भरुन निघणार : रजनी सावकारे
भुसावळ तालुक्यातील इतिहासात सलग चारवेळा निवडून येण्याचा बहुमान व भाग्यशाली ठरलेले आमदार संजय सावकारे एकमेव आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीत असताना आमदारांना मंत्री पद मिळाले होते व आता चौथ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांना पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या कामाची पावती देत मंत्री पद बहाल केल्याने आज मनस्वी आनंद होत असल्याचे आमदारांच्या सौभाग्यवती रजनी संजय सावकारे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या आमदारांच्या विजयासाठी झटणार्या निष्ठावान कार्यकर्ता, पदाधिकारी तसेच त्यांना मतदान करणार्या सर्व मतदारांचे आम्ही ऋणी आहोत. मंत्री पदासाठी शहरासह तालुक्याच आता अनुशेष भरून निघेल व आगामी पाच वर्षात विकासकामे आता जलदगतीने होतील, असेही रजनी सावकारे यांनी सांगितले. भुसावळच्या इतिहासात दुसर्यांदा मंत्री पद मिळवण्याचा बहुमानही आमदारांनी मिळवला असून यापुढे विकासाचा झंजावात असाच सुरू राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
भुसावळात आमदारांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष
आमदार संजय सावकारे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भुसावळातील आमदारांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तसेच फटाक्यांची आतषबाजी केली तसेच नाहाटा महाविद्यालयाजवळील चौफुलीवरही जल्लोष करीत लाडूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रवीण इखणकर, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, युवा मोर्चाचे माजी नगराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, कामगार आघाडी अध्यक्ष किरण मिस्तरी, चेतन सावकारे, यशांक पाटील, रुपेश देशमुख, माजी नगरसेवक शेखर इंगळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष दाढी चौधरी, प्रा.प्रशांत पाटील, अथर्व पांडे, चेतन जैन, एस.सी.मोर्चाचे अध्यक्ष राहुल तायडे, रवी दाभाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.