आधी वडिलांचे आजाराने निधन तर नंतर मुलाचाही अपघाती मृत्यू : जळगावातील घटना


First the father died of illness and then the son also died accidentally : Incident in Jalgaon न्युज डेस्क । जळगाव (19 डिसेंबर 2024) : दुर्धर आजाराने पित्याचे निधन झाल्यानंतर मुलाचाही जळगावात अपघाती मृत्यू ओढवला. ही घटना गुरुवार, 19 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. भुसावळकडून जळगावकडे येणार्‍या भरधाव आयशरने कृषी उत्पन्न समितीजवळ पायी चालत असलेल्या अजय सीताराम कोळी (26, पिंपळे खुर्द, ता.धरणगाव) या तरुणाला धडक देताच त्याचा जागीच मृत्यू झाला.

काय घडले नेमके ?
शहरातील अजिंठा चौकात बुधवार, 19 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास भुसावळकडून जळगावकडे आयशर भरधाव येत असताना वाहनाने पायी जाणार्‍या अजय कोळीला जोरदार धडक दिली. या घटनेत अजय कोळी हा तरुण जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. दरम्यान मयताच्या खिशातील कागदपत्रामुळे त्यांची ओळख पटली.


कॉपी करू नका.