जळगावात भरधाव ट्रकने महिलेला चिरडले


न्यूज डेस्क / जळगाव (21 डिसेंबर 2024) : शहरात छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर आज शुक्रवारी सकाळी 10.15 च्या सुमारास घडला. वंदना अशोक गोराडे (वय 55) असं अपघातातील मृत महिलेचं नाव असून याप्रकरणी पोलिसांनी ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतले आहे.

काय घडले नेमके ?
पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील रहिवासी अशोक गोराडे (60) हे दुचाकी (एमएच.19.डीजे.4796) वरून त्यांच्या शालकाच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी चांदसर कामतवाडी गावी जात असताना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर ट्रक (एमएच.21.एबी.7466) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.या अपघातात वंदना गोराडे यांचा जागीच मृत्यू झाला, अशोक गोराडे जखमी झाले आहेत. टॉवर चौकात कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक व कर्मचार्‍यांनी त्वरित धाव घेतली. पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे. मयत वंदना यांना एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !