जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी : चोरीच्या पाच दुचाकींसह चोरटा जाळ्यात
Jalgaon MIDC police’s big achievement: Thief caught with five stolen bikes जळगाव (23 डिसेंबर 2024) : जळगाव एमआयडीसी पोलिसांंनी चोरीच्या पाच दुचाकींसह चोरट्याला अटक केली. आरोपीने जळगावसह अडावद व छत्रपती संभाजी नगरातून तब्बल पाच दुचाकी चोरीची कबुली देत दुचाकी काढून दिल्या.
गोपनीय माहितीवरून कारवाई
एमआयडीसीतील अजिंठा चौकात संशयीत चोरीच्या मोटार सायकली विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना रविवार, 22 रोजी मिळाली. त्याआधारे पोलीस पथकातील विशाल कोळी, राहुल रपडे यांच्या आदेशानुसार पुढील तपास करण्यात आला.


माहितीच्या मागोवा घेऊन राहुल तायडे, चंद्रकांत चनके, योगेश बारी, फिरोज तडवी हे अजिंठा चौफुली या ठिकाणी सिव्हील ड्रेसमध्ये पहारा देत असताना संशयित आरोपी दीपक प्रेमसिंग सोळंके (रा.वरठाण, ता.सोयगांव जिल्हा छत्रपती संभाजी नगर) यास ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याच्या तब्येतून एचएफ डीलक्स ही मोटरसायकल मिळून आली. सदर आरोपीविरोधात जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहीती मिळून आली. त्यावरुन दीपक सोळंके याची चौकशी केली असता त्याने जळगाव शहरातून तीन, छत्रपती संभाजीनगर येथून एक आणि अडावद येथून एक अशा एकूण पाच मोटार सायकली चोरी केल्याची कबुली देत दुचाकी काढून दिल्या.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राहुल तायडे, चंद्रकांत धनके, योगेश बारी, राहुल रगडे, विशाल कोळी, फिरोज लक्ष्मी यांनी केली. आरोपीस जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.