क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेत भुसावळ पालिकेला सुवर्णपदक
भुसावळ (4 जानेवारी 2025) : शासनाचा नगर विकास विभागातर्फे जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे 27 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले. त्यात क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेत भुसावळ नगरपरिषदेचा संघ विजयी झाला.
बुध्दिबळ स्पर्धेत दीपक चौधरी हे प्रथम, गोळा फेकमध्ये महिला रेखा सोनवणे प्रथम तर 100 मीटर धावण्यात धीरज टाक द्वितीय आले. सर्व विजेत्या संघासह कर्मचार्यांचा महाबळजवळील जळगाव जिल्हा सैनिक हॉलमध्ये गोल्ड मेडल, व ट्रॉफी देवून गौरव करण्यात आला. भुसावळ नगरपरिषदेने एकूण 8 ट्रॉफी व 23 मेडल्स जिंकले आहेत. पालिका कर्मचार्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल प्रशासक जितेंद्र पाटील व मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी कौतुक केले आहे.








