भुसावळात उद्या लेवा पाटीदार समाजाचे वधू-वर परिचय संमेलन
भुसावळ (4 जानेवारी 2025) : अ.भा.लेवा पाटीदार युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेडतर्फे लेवा पाटीदार समाजातील विवाहोच्छुक युवक-युवतींचे परिचय संमेलन रविवा, 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता संतोषीमाता हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. यावेळी शैक्षणिक व कौटुंबिक माहिती असलेल्या परिचय सूचीचे प्रकाशन होणार आहे.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी आमदार एकनाथराव खडसे असतील, प्रसंगी केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार राजुमामा भोळे, आमदार अमोल जावळे यांचा भव्य नागरी सत्कार होईल. कुटुंब प्रमुख ललित पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार उल्हास पाटील, संजय राणे व समाजातील मान्यवर उपस्थित राहतील. या कार्यक्रमास सर्व समाजबांधवांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन अध्यक्ष अॅड.प्रकाशराव पाटील उपाध्यक्ष राजेश सुधाकर चौधरी, शहराध्यक्ष देवेंद्र वाणी बहिणाबाई ब्रिगेड अध्यक्ष स्वाती भोळे, डॉ.बाळू पाटील, रुपेश चौधरी, शाम भारंबे, शुभम पाटील व कार्यकर्त्यांनी केले आहे.








