म्हसावदला ज्वेलरी दुकानातून 55 हजारांचे दागिने लांबवले


जळगाव (5 जानेवारी 2025) : ज्वेलर्सचे दुकान फोडत चोरट्यांनी 55 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने, बेन्टेक्स दागिने आणि सीसीटीव्ही कॅमेरा लांबवला. म्हसावद येथील चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद दुकानाला केले टार्गेट
जळगाव तालुक्यातील म्हसावद गावात दीपक नामदेव सोनार (39) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. सुवर्ण व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे गावातच मरीमाता मंदिराजवळ बिदाई ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. 2 जानेवारी ते 3 जानेवारी दरम्यान त्यांचे दुकान बंद असताना त्यांच्या दुकानातून 55 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने, फॅन्सी बेन्टेक्सचे दागिने आणि पाच हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना शुक्रवार, 3 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता उघडकीस आली. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुपारी 12 वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !