स्वतःतील कला गुण कौशल्य ओळखून करिअरची करा निवड : श्रीकांत लांबोळे
भुसावळ (12 जानेवारी 2025) : स्वतःतील कला गुण कौशल्य ओळखून करिअरची करा निवड करावे, असे आवाहन जळगाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे श्रीकांत लांबोळे यांनी येथे केले. भुसावळ शहरातील दि पीपल्स चॅरिटेबल संस्था संचालित दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात युवती सभा अंतर्गत मिशन साहसी अभियान या पाच दिवशीय कार्यक्रमांमध्ये तिसर्या दिवशी जळगाव येथील श्रीकांत लांबोळे यांनी स्वयंरोजगार व उद्योजकता संधी याविषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. श्रीकांत लांबोळे यांनी युवतींना करिअरची निवड कशा प्रकारे करायची यासाठी मार्गदर्शन केले शिवाय कौशल्य विकास अंतर्गत असलेल्या आचार्य चाणक्य एम्प्लॉयमेंट स्कीम, प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र, प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र यासारख्या योजनांची सविस्तर माहिती दिली. प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी युवतींना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्रात जाऊन त्यांच्या योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहन करीत युवतींना रोजगार प्राप्त होईल, असेही सांगितले. सूत्रसंचालन गायत्री नेमाडे तर आभार डॉ.ए.आर.सावळे यांनी मानले. प्रा.आर.डी.भोळे, संगीता धर्माधिकारी, डॉ.अंजली पाटील व श्रेया चौधरी उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.

