भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांना अभिवादन


भुसावळ (शनिवार, 1 ऑगस्ट 2026) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात एन.एस.एस. विभाग, समारंभ समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.मीना चौधरी होत्या. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.वसंत खरे, एनएसएस विभागाचे सहसमन्वयक प्रा.संदीप नेतनराव, प्रा.निलेश गुरूचल व्यासपीठावर उपस्थित होते.

मानसी महाजन, हर्षदा जाधव, हर्षदा लोहार तसेच साक्षी कांबळे यांनी लोकमान्य टिळक आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

महापुरूषांचे विचार आत्मसात करा
महापुरुषांचे विचार आत्मसात करावे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावाखख असे आवाहन डॉ.मीना चौधरी यांनी केले. दोन्ही समाजसुधारकांनी आपापल्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. लोकमान्य टिळक हे जहाल विचार सरणीचे होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. सरकारचे डोके ठिकाणावर आहेत का? नाही असा निर्भीड प्रश्न त्यांनी इंग्रजांना विचारला. मराठा व केसरी सारखे वर्तमानपत्रे तयार करून समाजात एकोप्याची भावना निर्माण केली.

अण्णाभाऊ साठे हे दीड दिवसाच्या शाळेत गेले होते. पण त्यांनी आपल्या जीवनात आलेल्या अनुभवांना साहित्याच्या माध्यमातून लोकांपुढे प्रश्न मांडले. त्यांची फकीरा, वारणेचा वाघ, वैजयता, चित्रा, चंदन, इत्यादी कादंबर्‍या तसेच पोवाडा, लावणी, पदे, गीते इत्यादी प्रकारातही त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळले आहे. अशा समाजसधारकांकडून आपण आदर्श घेतला पाहिजे.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा.संदीप नेतनराव यांनी तर आभार प्रा.रुकसाना शेख यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !