चहा विक्रेत्याने दिली आगीची आरोळी अन् भेदरलेल्या प्रवाशांना टाकल्या उड्या : पाचोरा रेल्वे अपघाताची अजित पवारांनी दिली माहिती
पुणे (23 जानेवारी 2025) : रेल्वेतील चहा विक्रेत्याने आग लागल्याची ओरड करताच जनरल डब्यातील प्रवासी भेदरले व आगीत होरपळण्याच्या भीतीने त्यांनी रेल्वे बाहेर पटापट उड्या टाकल्या व तितक्यात कर्नाटक एक्स्प्रेसने प्रवाशांना चिरडले, अशी माहिती पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.
जीव वाचवण्यासाठी उड्या मात्र गाठले मृत्यूने
अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पुष्पक एक्सप्रेसमध्ये उदल कुमार (30, उत्तर प्रदेश) हे लखनऊ ते मुंबई पुष्पक एक्सप्रेसने रोजगारासाठी मुंबईला येत होते. त्यांच्यासोबत त्यांचे मेहुणे विजयकुमारही होते. ते सर्वसाधारण तिकीटाने जनरल बोगीच्या वरच्या आसनावर बसले होते. त्यावेळी अचानक रेल्वेच्या रसोईतील चहा विक्रेत्याने आगली लागली, आग लागली अशी आरडाओरड केली. त्याची ही आरोळी ऐकू येताच बोगीत अचानक गोंधळ उडाला. आजूबाजूच्या बोगीतही गोंधळ उडाला. यामुळे घाबरून काही प्रवाशांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रेल्वेच्या दोन्ही बाजूंनी उड्या मारल्या.

याचवेळी दुसर्या रुळावरून जात असलेल्या बंगळुरू – नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना उडवले. त्यानंतर ही रेल्वे काही अंतरावर जाऊन थांबली. या घटनेत 13 प्रवासी ठार झाले तर 11 हून अधिक प्रवासी जखमी झाले.
