शरद शेवाळे जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे नूतन प्रभारी : जिल्ह्यात तीन अधिकार्यांना नेमणुका
जळगाव (मंगळवार, 8 सप्टेंबर 2026) : जळगाव जिल्ह्यात नव्याने बदलून आलेल्या तीन प्रभारी पोलीस निरीक्षकांना पोस्टींग मिळाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी बदलीसंदर्भातील आदेश मंगळवार, 8 सप्टेंबर रोजी जारी केले आहेत.
या अधिकार्यांना मिळाली पोस्टींग
रायगडावरून आलेले निरीक्षक निवृत्ती भीमराव बोर्हाडे यांना जामनेर पोलीस ठाण्याच्या प्रभारी नियुक्ती देण्यात आली.

भंडारा येथून आलेले निरीक्षक शरद उत्तमराव शेवाळे यांना जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी नियुक्ती देण्यात आली.
राज्य गुन्हे विभागाकडून आलेले निरीक्षक नितीन सुदाम पाटील यांना जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार सोपवण्यात आला.
तातडीने पदभार घेण्याच्या सूचना
जामनेर प्रभारी व सहा.निरीक्षक स्वप्नील शिंदे यांना पदाच्या कार्यभारातून मुक्त करण्यात आले तर गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याकडील आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार आता नवीन अधिकार्यांकडे देण्यात आला आहे शिवाय जिल्हापेठ प्रभारी अनिल वाघ यांच्याकडील पदभार काढण्यात आला असून त्यांना जिल्हापेठ येथे नियुक्ती देण्यात आली आहे. नूतन अधिकार्यांनी तत्काळ पदभार घेण्याचे आदेशात नमूद आहे.

