डॉ.केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये पोषण सप्ताह उत्साहात
जळगाव (मंगळवार, 8 सप्टेंबर 2026) : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे समुदाय आरोग्य परिचर्या विभागाच्या वतीने 1 ते 7 सप्टेंबर 2026 या कालावधीत पोषण सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
यावर्षीच्या पोषण सप्ताहाची संकल्पनापोषणाची शक्ती जाणून घ्या अशी होती.या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पोषणाचे महत्त्व, संतुलित आहार, आरोग्यदायी जीवनशैली आणि पोषणविषयक जनजागृती निर्माण करणे हा होता. पोषण सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी रांगोळी व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पोषण, संतुलित आहार, कुपोषण प्रतिबंध आणि आरोग्यदायी आहार यांसारख्या विषयांवर आकर्षक रांगोळ्या व माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केले.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रा.प्रीती गायकवाड, प्रा.अस्मिता जुमडे, प्रा. सुमित भारंबे, प्रा.श्रृती गोरोले तसेच इतर सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पोषण जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समुदाय आरोग्य परिचर्या विभागातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

