उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टच म्हणाले ; ‘त्या’ लाडक्या बहिणींच्या खात्यातून पैसा रिकव्हर करण्याचा अजिबात विचार नाही


Deputy Chief Minister Ajit Pawar clearly said; There is no intention at all to recover money from the accounts of ‘those’ beloved sisters. मुंबई (23 जानेवारी 2025) : आता खरोखरच लाडक्या बहिणींना लाभ द्यायचा आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही हळूहळू पावले उचलत असून अनेक सधन महिलांच्या खात्यातही लाडक्या बहिण योजनेची रक्कम गेल्याने त्यांच्या खात्यातून पैसे वसुल होणार का? असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत असताना अजित पवार यांनी याबाबत भूमिका मांडली आहे. सरकारचा असा कोणताही पैसा रिकव्हर करण्याचा विचार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेनिमित्त अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.


बांग्लादेशी महिलांच्या खात्यातही योजनेचा लाभ
विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजना नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय झाली. या योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना थेट आर्थिक लाभ देण्यात आला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांना भरघोस यश मिळाले. आता या लाडक्या बहिण योजनेवरून राज्यात आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यातच आता लाडकी बहिण योजनेचा लाभ बांगलादेश मधील महिलेने देखील घेतल्याचे समोर आले..

अपात्र लाडक्या बहिणींचेपैसे परत घेणार नाही- तटकरे
लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांकडून सरकारने दिलेले पैसे परत घेऊ, असे वक्तव्य महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी केले होते मात्र टीकेची झोड उठताच त्यांनी अपात्र महिलांकडून सरकार पैसे परत घेणार नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. तटकरे यांच्या वक्तव्यावर शिवसेना आणि भाजप मंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. दावोस येथूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी तटकरेंची कानउघाडणी केल्याचे समजते.

बांगलादेशी महिलेनेही घेतला लाडकी बहिण योजनेचा लाभ
मुंबईतील कामठीपुरा भागात अटक करण्यात आलेल्या पाच बांगलादेशी नागरिकांमधील एका महिलेने राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेची लाभ घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी या नागरिकांना मदत करणार्‍या एका एजंटला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !