अजित पवारांनी स्पष्टच सांगितले : धुनी, भांडी मोलमजुरी करणार्या महिलांसाठी लाडक्या बहिण योजनेचा लाभ
Ajit Pawar clearly stated: The benefit of the Ladkya Bahin scheme for women who work as dhuni and pandit labourers भिगवन (27 जानेवारी 2025) : लाडक्या बहीण योजनेचे पैसे महिला धुनी, भांडी मोलमजुरी करतात अश्यांसाठी आहे. ज्यांचा ऊस दोनशे चारशे टन जातो ज्यांचे उपन्न जास्त आहे अश्या महिलांचे पैसे बंद होतील, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करीत आगामी काळात सधन कुटूंबातील महिला या योजनेच्या लाभापासून अपात्र ठरतील हे स्पष्ट आहे.
या निकषातील महिलांनाच मिळणार लाभ
अजित पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार अश्या अफवा पसरविल्या जात आहेत परंतु ज्या महिलांचे उत्पन्न वार्षिक 2 लाख 40 हजार आहे म्हणजेच महिना 20 हजार उत्पन्न अश्याच महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. भिगवण येथील हॉटेल विश्वजितच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

बांग्लादेशींना लाभ : यंत्रणेकडून कसून चौकशी
अजित पवार पुढे म्हणाले की, काही बांगलादेशी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत आहेत याची चौकशी सुरू असून यानंतरच उचित बोलता येईल. यावेळी मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, पुणे जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष प्रदीप गारटकर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, हनुमंत बंडगर,बारामती अग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे, दत्तकला संस्थेचेरामदास झोळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे आदी उपस्थित मान्यवर उपस्थित होते.
